विशेष प्रतिनिधी
सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून अनेक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आणि काँग्रेस केवळ जातीच्या आधारावर टार्गेट करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीसांविषयी मोठे गौरवोद्गार काढले आहेत. मी उदयन फडणवीस आणि तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गौरव केला आहे. Udayan raje says, you are devendra raje bhonsle!!
सातारा भाजपने आयोजित केलेल्या टिफिन बैठकीत उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस विषयीचे आपले अनेक अनुभव कार्यकर्त्यांबरोबर शेअर केले.
उदयनराजे भोसले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे 24 तास काम करतात तशीच कामाची धडाडी देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली. त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन जा त्यांचा नकार नसतोच. पण एवढे काम करणाऱ्या माणसालाही टीकेला सामोरे जावे लागते याचे कारण एकच आहे, ते म्हणजे ते देवेंद्र “फडणवीस” आहेत.
https://youtu.be/fx9oz5E1LN4
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवला. त्यांनी कोणाही व्यक्तीशी जातीच्या आधारावर भेदभाव केला नाही. पण हे काँग्रेसवाले इतर लोकांना जातीवरून टार्गेट करतात. पण ही शिकवण आम्हा छत्रपतींच्या वंशजांना नाही. फडणवीसांचे चुकले असेल, तर एकच म्हणजे ते देवेंद्र “फडणवीस” आहेत.
पण छत्रपतींचा वंशज म्हणून सांगतो, मी उदयन फडणवीस आहे आणि तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात, असे गौरव उद्गार उदयनराजे भोसले यांनी काढले. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
उदयनराजेंच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी जातीच्या आजारावर टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशजाने देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्रराजे भोसले म्हणणे यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा काय असेल, हे स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App