शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करताना ठाकरेंकडून काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले, ते देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शेजारी उभे असताना!! UBT flanked by INC leaders says that Shushilkumar Shinde as Cong CM before elections

त्याचे झाले असे :

अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आले. सुरुवातीला जयंत पाटील बोलले त्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, या फुकट वाटण्याच्या योजना फसव्या असतात. मागे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेवर काँग्रेसने निवडणुका जिंकल्या, पण निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेसने विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केले आणि विलासराव यांनी मुख्यमंत्री पदावर येतात आधीची घोषणा रद्द केली. शेतकऱ्यांना वीज बिल भरायला सांगितले. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना महिलांना किंवा बाकी कोणाला मोफत देतो असल्या सरकारच्या घोषणा खोट्या असतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विशेष बाब म्हणजे ज्या सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीचा उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला, त्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्री पदावर आणि अर्थमंत्री पदावर जास्तीत जास्त काळ अजित पवारच होते. आणि आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळातही अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही अजित पवारच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते, पण त्यांच्या 2024 – 25 च्या अर्थसंकल्पावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख या दोन मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले. त्यावेळी नाना पटोले जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हे नेते उद्धव ठाकरे यांच्या शेजारी उभे होते.

UBT flanked by INC leaders says that Shushilkumar Shinde as Cong CM before elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात