विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले उमेदवार उतरविण्याची घोषणा केली खरी, पण मतदानाचे तीन टप्पे ओलांडून गेले तरी नेमके उमेदवार कोण आणि ते काय करतात याचा फारसा खुलासा होत नव्हता. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेना नेत्यांच्या उत्तर प्रदेशात गर्जना होताना दिसत आहेत. पण राष्ट्रवादीने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करू नये ते स्टार प्रचारक आहेत कुठे??, असा प्रश्न विचारला जात आहे. U P election 2022: Shiv Sena leaders including Aditya-Raut roar in Uttar Pradesh; Where are the star campaigners of NCP…??
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्या अटकेचा आणि ईडी कोठडीचा “विशिष्ट मुहूर्त” साधत उत्तर प्रदेशात प्रचारासाठी कूच केले. बरोबर खासदार संजय राऊत यांना देखील घेतले. त्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते उत्तर प्रदेशात गेले दोन दिवस प्रचार करताना दिसत आहेत. यामध्ये इचलकरंजी शिवसेना खासदार सत्यजित माने यांचे भाषण मराठी माध्यमांमध्ये गाजताना दिसत आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील महाराष्ट्राच्या वतीने उत्तर प्रदेशात प्रचार सभांमध्ये बोलत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मात्र नेते कुठे दिसत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, पण यापैकी एकही स्टार प्रचारक उत्तरप्रदेशात फिरकला नसल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेने 39 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. गोरखपूर मध्ये शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्री आदित्य योगी आदित्यनाथ यांच्या समोर टक्कर देत आहेत. पण राष्ट्रवादीचे नेमके उमेदवार आहेत तरी किती?? ते कोणत्या चिन्हावर लढत आहेत आणि त्यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांची पैकी नेमके कोणते स्टार प्रचारक प्रचार करत आहेत??, याचा पत्ता मात्र कोणाला लागत नाही. स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांची नावे आहेत. पण यापैकी कोणीही नेता उत्तर प्रदेश कडे फिरकलेला दिसला नाही.
उत्तर प्रदेशातच काय पण गोव्यात देखील प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते फिरकले असे दिसले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी बाबत नुसतीच स्टार प्रचारकांची यादी प्रत्यक्षात प्रचार नाही अशी स्थिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App