विशेष प्रतिनिधी
मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने हलगर्जीपणाचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे दोन्ही अधिकारी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातल्या कारवाईमध्ये सहभागी होते.Two officers suspended in connection with Aryan Khan drugs case; NCB action
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने छापा टाकत ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. तो आणि त्याच्यासह इतर १९ जणांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अमली पदार्थ बाळगणं, त्यांचं सेवन करणं, त्यांची खरेदी विक्री करणं यासाठी कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणात आर्यनसह इतर १७ जणांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र दोघेजण अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.अमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ही अग्रणी केंद्रीय तपास संस्था आहे. त्याचे पश्चिम प्रादेशिक मुख्यालय मुंबईत आहे. या तपास संस्थेद्वारे मागीलवर्षी ऑक्टोबरपर्यंत मोठ्या कारवाया करण्यात आल्या.
वर्षभरात सुमारे २५हून अधिक कारवाया करून जवळपास १०० जणांना अटकही केली. एनसीबी मुंबईचे तत्कालिन संचालक समीर वानखेडे यांनी या धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. मात्र ऑक्टोबरमध्ये अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले.
यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान एनसीबीने फक्त दोन कारवाया केल्या. दरम्यानच्या काळात वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ संपल्यावर त्यांना पुन्हा महसूल गुप्तचर संचालनालयात (डीआरआय) धाडले. तेथून त्यांची अन्य एका विभागात बदली करण्यात आली असून ते दीर्घ रजेवर गेले आहेत. याच दरम्यान डीआरआयच्या मुंबई प्रादेशिक मुख्यालयांतर्गतही अमली पदार्थविरोधी फार मोठ्या कारवाया केलेल्या नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App