प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण आता महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीच्याच दोन मंत्र्यांची परस्परविरोधी आणि विसंगत विधाने समोर आली आहेत. Two NCP ministers Dilip Walse-Patil and Nawab Malik opposite speech
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये नियम पाळलेच पाहिजेत. तेथे बाकी कुठल्याही गोष्टींना प्राधान्य देण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. त्याच वेळी त्यांनी राजकीय फायद्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी हिजाबच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात आंदोलन करू नये. दुसऱ्या राज्यातील वादामुळे महाराष्ट्रात वाद उकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे आवाहन केले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियम पाळलेच पाहिजेत, असे वक्तव्य काल शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील केले आहे. त्यालाच दिलीप वळसे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
एकीकडे दिलीप वळसे पाटील यांचे हे मत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. हिजाब घालायचा का नाही?, हे भाजपचे नेते कोण ठरवणार?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यघटनेने सर्वांना स्वतःचा पोशाख निवडण्याचे अधिकार दिले आहेत. त्यात भाजपचे नेते हस्तक्षेप करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
त्याच वेळी पुण्यात महात्मा फुले वाड्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिजाब प्रकरणावरून कर्नाटक सरकारचा निषेध करण्याचे आंदोलन केले आहे. एकीकडे दिलीप वळसे-पाटील यांनी आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे, त्यालाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. तसेच नवाब मलिक यांनी देखील हिजाबच्या मुद्द्यावर वळसे-पाटील यांच्यापेक्षा वेगळा सूर लावल्याचे ही स्पष्ट झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App