दोन हल्ले; एक मराठा आंदोलकांचा, दुसरा मधमाशांचा!!

Maratha protesters

विशेष प्रतिनिधी

जालना : जालना जिल्ह्यात झालेल्या दोन हल्ल्यामुळे आज महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातला एक हल्ला मराठा आरक्षण आंदोलकांनी केला, तर दुसरा हल्ला कुठल्या आंदोलकांनी नाही तर थेट मधमाशांनी केला. त्यामुळे हे दोन्ही हल्ले महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले.Two attacks; one by Maratha protesters, the other by bees!!

– गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला

मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदेशीर लढाई लढणारे वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी आज हल्ला केला. गुणरत्न सदावर्ते हे धनगर आंदोलकांना भेटण्यासाठी आंदोलन स्थळी जात असताना काही मराठा आंदोलकांनी त्यांच्या लिमोझिन गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचेवर मोठमोठ्या थपडा मारल्या. परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करून मराठा आंदोलकांना अडवून ताब्यात घेतले. आपली लढाई संविधानाची आहे असे कुठलेही हल्ले आपल्याला लढाई लढण्यापासून रोखू शकत नाहीत. धनगर बांधवांना भेटायला जात असताना माझ्या गाडीवर हल्ला झाला. पण त्याने मला फरक पडणार नाही, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचे त्यांनी समर्थन केले.



मनोज जरांगेंच्या बैठकीवर मधमाशांचा हल्ला

त्याचवेळी मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराटीत आयोजित केलेल्या बैठकीवर थेट मधमाशांचा हल्ला आला. अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या शेतावर मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मराठा समन्वयक हजर होते. बैठक सुरू असतानाच एका दिशेने मधमाशांचे मोहोळ उठले त्या मधमाशांनी तिथे उपस्थित असणाऱ्या माणसांवर हल्ला केला. त्यामुळे मराठा आंदोलकांची बरीच धावपळ झाली. मराठा आंदोलकांनी शाली पांघरून मनोज जरांगे यांना सुरक्षित स्थळी हलविले. पण जालना जिल्ह्यात झालेले हे दोन हल्ले संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले.

Two attacks; one by Maratha protesters, the other by bees!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात