विशेष प्रतिनिधी
ठाणे : Ambernath अंबरनाथ नगपरिषदेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ठाकरेंपासून शिंदेपर्यंत साऱ्यांनी भाजपवर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले. आता या राजकीय नाट्याचा दुसरा प्रसंग रंगला असून, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना आता भाजपने प्रवेश दिलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.Ambernath
अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील आणि त्यांच्यासह इतर ११ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. याची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, काँग्रेसच्या या कारवाईला न जुमानता प्रदीप पाटील यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड, कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App