नाशिक : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे शंभर दिवस भरल्यानंतर नव्हे, तर पूर्ण झाल्यानंतर सकाळ आणि पोल पंडित यांनी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या जनतेने फडणवीस सरकारवर विश्वास दाखविला, पण यातून जनतेने विरोधकांच्या तोंडावर चपराक हाणण्यापेक्षा, ती “पवार बुद्धीच्या” माध्यमांच्या तोंडावर हाणलेली चपराक असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कारण महायुतीला प्रचंड बहुमत मिळून फडणवीस सरकार सत्तेवर आले, त्यावेळी पवारांच्या हातात कुठलेच पत्ते खेळण्यासारखे उरले नाहीत, याची खंत खुद्द पवारांना वाटली नव्हती एवढी “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना वाटली होती. त्यामुळे फडणवीस सरकार पुढची पाच वर्षे चालणार अगदी पवारांनी कुठलेही उलटे पालटे सुलटे डाव टाकले तरी ते सरकार तस्स की मस्स हलणार नाही, या जाणिवेने पवार बुद्धीची माध्यमे कासावीस झाली होती. या कासावीशी बुद्धीतूनच मराठी माध्यमांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रकरणांना असे काही नॅरेटिव्हचे रंग चढवले होते की, जणू फडणवीस सरकार आल्यामुळे महाराष्ट्रावर संकटाचे आभाळच कोसळले!! पण प्रत्यक्षात पवारांचेच माध्यम असलेल्या सकाळने आणि पोल पंडित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून फडणवीस सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेने विश्वास दाखविल्याचे दिसले त्यामुळे महाराष्ट्रात उरलेल्या आणि उरलेल्या विरोधकांपेक्षा पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांच्या तोंडात चपराक बसली.
अन्यथा बीड + संतोष देशमुख + वाल्मीक कराड + धनंजय मुंडे प्रकरणातून महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली इथपासून ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारापर्यंतच्या सगळ्या प्रकरणांमध्ये फडणवीस सरकारला घेरायची संधी विरोधकांपेक्षा मराठी माध्यमांनी सोडली नव्हती. मग त्यात बदलापूरचे प्रकरण आले. औरंगजेबाची कबर आली. हलाल की झटका प्रकरण आले या सगळ्या प्रकरणांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह खात्यावर “नियंत्रण” नाही, हा पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा “लाडका नॅरेटिव्ह” मराठी माध्यमांनी एवढा डंका पिटत चालवला होता की, फडणवीसांना आता गृह खाते सोडण्यापासून पर्यायच नाही, अशी वातावरण निर्मिती केली होती. पण प्रत्यक्षात फडणवीस आपल्या विशिष्ट कार्यशैलीतून या सगळ्यांचे “बाप” निघाले आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा सकाळ आणि पोल पंडितच्या सर्वेक्षणात त्यावर शिक्कामोर्तब करून टाकले.
– आकडे बोलतात
सकाळ आणि पोल पंडितच्या सर्वेक्षणात तब्बल 54 % नागरिकांनी सरकारच्या कामगिरीला चांगले म्हटले. 19 % नागरिकांनी सरासरी म्हटले तर 27 % नागरिकांनी खराब म्हटले. याचा अर्थ सरकारची कामगिरी खराब म्हणणाऱ्या 27% नागरिकांपेक्षा 54% नागरिकांना सरकारची कामगिरी चांगली वाटते. इतकेच काय, पण सर्व नागरिकांनी फडणवीस सरकारला तीन गोष्टींवर काम करायला सांगितले शेती, रोजगार आणि शिक्षण या विषयांवर या नागरिकांनी भर दिला. या तीन क्षेत्रांमध्ये फडणवीस सरकारने चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याचा अर्थ असा की फडणवीस सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने केवळ चांगले म्हटले असे नाही तर पुढच्या पाच वर्षांत त्याचा अजेंडा सेट करताना त्याच सरकारकडून चांगली कामगिरी होऊ शकेल अपेक्षाही व्यक्त केली. ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात उरलेल्या सूरलेल्या विरोधकांपेक्षा “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना जनतेने हाणलेली चपराक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App