बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती’ या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवासाच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या सुविधेमुळे बेस्टच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल. प्रवाशांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App