दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे. Transport Minister should pave way by coordinating with ST employees: Praveen Darekar
विशेष प्रतिनिधी
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कामगार ठाम असल्याचे चित्र राज्यभरात बघायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील एसटी कामगार हे आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत.
मात्र हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा या साठी राज्यसरकार कारवाई करण्याचा मार्ग अवलंबत आहे.या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून संप मागे न घेतल्यास मेस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा कायदा अंतर्गत कारवाई करावी लागेल असा इशारा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
मविआ सरकारमध्ये काँग्रेसची प्रत्येक टप्प्यावर फरफट होताना दिसतेय. काँग्रेसला विदर्भात जनाधार आहे, कराराप्रमाणे विदर्भात अधिवेशन घेण क्रमप्राप्त होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांची याबाबत आग्रही भूमिका असताना त्यांच्या आग्रहाला केराची टोपली दाखवण्याचं काम सरकारने केले आहे. pic.twitter.com/H7NZWYxrlg — Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) December 3, 2021
मविआ सरकारमध्ये काँग्रेसची प्रत्येक टप्प्यावर फरफट होताना दिसतेय. काँग्रेसला विदर्भात जनाधार आहे, कराराप्रमाणे विदर्भात अधिवेशन घेण क्रमप्राप्त होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांची याबाबत आग्रही भूमिका असताना त्यांच्या आग्रहाला केराची टोपली दाखवण्याचं काम सरकारने केले आहे. pic.twitter.com/H7NZWYxrlg
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) December 3, 2021
दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं आहे. यावेळी दरेकर म्हणाले की, एसटी संपाबाबत सरकार समन्वयातून मार्ग न काढता निलंबनाचा तसेच सेवा समाप्तीचा आणि पोलीस बळाचा वापर करत आहे.
पुढे दरेकर म्हणाले की ,मेस्मासारखी कठोर कारवाई करुन हे आंदोलन चिरडता येणार नाही. कर्मचार्यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App