विशेष प्रतिनिधी
मुंबई : आझाद मैदानापासून ते पार मुंबईच्या वेशीपर्यंत मराठा मोर्चा मुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून त्यामुळे गणेश भक्तांची मोठी पंचाईत झाली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत असाल तर मुंबई पोलिसांची ही ट्रॅफिक ॲडव्हायझरीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Maratha agitation
मराठा आंदोलक मनोज जरांगे काल रात्रीच पाटील मुंबईत पोहोचले. त्यांच्यासोबत हजारो समर्थक हे आझाद मैदानात आलेत. त्यांना फक्त 5000 आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी आहे पण आंदोलकांची संख्या खूप जास्त आहे. जवळपास 6500 हजाराहून अधिक वाहने मुंबईत दाखल झाली आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाची सूचना देण्यात आली आहे. खास करुन गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई पोलिसांची ही ट्रॅफिक ॲडव्हायझरी डोळ्याखालून जरूर घालावी.अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होत आहेत प्रशासनानुसार, आझाद मैदानात 20 हजारांच्या घरात आंदोलक असतील. या मैदानाची क्षमता अवघी 5000 हजार इतकीच आहे
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि सायन-पनवेल हायवेवर मराठा आंदोलकांची वाहनं आहेत. मुंबईतील महत्त्वाचे मार्ग ईस्टर्न फ्रीवे,सायन-पनवेल हायवे, पनवेल-सायन महामार्ग, व्ही. एन पुर्व मार्ग, पी डी मेलो रस्ता, वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. दादाभाई नैरोजी मार्ग आणि हजारीमल सोमानी रस्ता हे सर्व मार्ग बंद असतील. केवळ अत्यावश्यक मार्गासाठी या मार्गांचा वापर करता येईल. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी योग्य मार्गाचाच वापर करावा.
In view of Morcha at Azad Maidan on 29th August 2025, following traffic arrangements will be in place from 0.00 hrs on 29th August till further orders. Citizens are requested to plan commute likewise.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/4DSU5LbMFN — Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 28, 2025
In view of Morcha at Azad Maidan on 29th August 2025, following traffic arrangements will be in place from 0.00 hrs on 29th August till further orders.
Citizens are requested to plan commute likewise.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/4DSU5LbMFN
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 28, 2025
हे मार्ग बंद
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक आंदोलन मुंबईकडे येत आहेत. काही आंदोलक रेल्वेने दाखल होत आहेत. हे आंदोलक हजारोच्या संख्येने असतील. हे आंदोलक सीएसटीकडे धावणाऱ्या लोकलमधून प्रवास करतील. त्यामुळे लोकलवरही परिणाम झाला आहे.
आझाद मैदान परिसर ते दादरपर्यंतच्या परिसरावर परिणाम
आंदोलक हे मोठ्या संख्येने वाहनांनी मुंबईत दाखल होत आहे. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी उसळली आहे. अजून मोठ्या संख्येने गर्दी लोटण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर, वाशीत थांबवण्यात सरकारला यश आले होते. पण यावेळी थेट मुख्य मुंबईत मराठा मोर्चा आला आहे. त्याचा अर्थातच केवळ आझाद मैदान परिसरावर ताण येणार नाही, तर दादरपर्यंतच्या परिसरापर्यंत परिणाम होतो आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App