वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होतआहे. २२ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. ऑगस्टमध्ये श्रावण सरी नसल्याने बळीराजाचीचिंता वादळी होती. परंतु महाराष्ट्रात पुन्हा कोसळतील जलधारा, अशी परिस्थिती येत्या ४ दिवसात निर्माण होत आहे. Torrential rains in Maharashtra again, possibility for three-four days
मराठवाड्याला कमी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नव्हती. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत आहेत.कमी दाबाचे क्षेत्र तयार महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात काय स्थिती असणार?
कोकणात ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यात साधारण ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज?
मराठवाड्यात उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. लातूर आणि उस्मानाबादसाठी जिल्ह्यात काहीठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती?
मध्य महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत १५ मिमी ते ६४ मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. उद्या नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताआहे.
विदर्भातील पाऊस ?
विदर्भात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App