विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राने येणे, त्याने मोठी गुंतवणूक करणे ही आत्तापर्यंत सरकारच्या आणि खासगी क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य होणारी बाब होती. पण आता मात्र महाराष्ट्रात मोठे उद्योग आणि गुंतवणूक येणे – जाणे याविषयी सार्वजनिक चव्हाट्यावर उणे दुणे काढणे सुरू आहे. Too much politics affected economic investment in maharashtra
गुंतवणुकीत काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र खरंच प्रथम क्रमांकावर होता. त्या पाठोपाठ गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांची महाराष्ट्राला स्पर्धा असे. ही तीनही राज्ये आणि त्या पाठोपाठ कर्नाटक ही औद्योगिक दृष्ट्या संपूर्ण देशात प्रगत मानलेली आहेत. पण 1990 च्या दशकानंतर ही स्पर्धा आणखी वाढली आणि त्यामध्ये केरळ बिहार ओरिसा यासारख्या राज्यांची देखील भर पडली. पण महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक फारसा कधी खाली घसरला नव्हता. आजही महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या तीन क्रमांकांमध्येच आहे. तरी देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजकीय उणी दुणी काढणे हे महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचे काम झाले आहे.
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आला – गेला. त्याआधी नाणार प्रकल्प महाराष्ट्रात आला गेला टाटा एअरबस प्रकल्प आला – गेला. यातले आर्थिक गुंतवणुकीचे गांभीर्य आणि त्यामागचे प्रयत्न लक्षात न घेता केवळ राजकीय हेतूंनी एकमेकांविरुद्ध आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. प्रकल्प कोणामुळे गेला याचे अपश्रेय राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर ढकलत आहे. पण असे अपश्रेय एकमेकांवर ढकलण्याची वेळ महाराष्ट्रावर येणे हे खरे म्हणजे इथल्या संपूर्ण पॉलिटिकल क्लासचे अपयश आहे!!
उद्योग क्षेत्रातील आर्थिक गुंतवणूक ही राजकीय वादाच्या पलिकडची बाब असताना त्यामध्ये अतिरिक्त राजकीय वाद ओढून आणण्यात आला आहे. या वादामुळेच खरे म्हणजे गुंतवणूक महाराष्ट्र बाहेर जाते. ठीक ठिकाणी या राजकीय वादामुळेच गुंतवणुकीत पासून ते प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीपर्यंत आणि नंतर प्रकल्प चालवताना अडथळे उत्पन्न केले जातात. ही बाब इथला पॉलिटिकल क्लास लक्षात घेतो का?? हा खरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर देण्यातच महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीचे येणे – जाणे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App