विशेष प्रतिनिधी
मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग, ठाणे महापालिका यांच्यावतीने महाराष्ट्रातून ‘’टोकियो ऑलिम्पिक २०२०’’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर नरेश गणपत म्हस्के आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा नियोजन भवन येथे स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. Tokyo Olympics; Good luck to ten players
ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा नियोजन भवन व दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे ‘सह्यांची मोहीम” व ”सेल्फी पॉईंट” कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रियांका पाटील, उप आयुक्त मीनल पालांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे तसेच तालुका क्रीडा अधिकारी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तेजस्विनी सावंत (५० मी. रायफल शुटिंग), राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग २५ मी.), प्रवीण जाधव ( आर्चरी रिव्हर्स ), चिराग शेट्टी (बॅडमिंटन पुरुष दुहेरी ), स्वरूप उन्हाळकर(पॅरा शूटिंग- १० मी.रायफल), अविनाश साबळे (अँथलेटिक्स-३००० मी स्टीपलचेस), सुयश जाधव ( पॅरा स्विमिंग) उदयन माने ( गोल्फ ), भाग्यश्री जाधव ( पॅरा अँथलेटिक्स- गोळा फेक) आणि विष्णू सरवानन ( सेलिंग लेसर सॅन्डर्ड क्लास) हे १० खेळाडू सहभागी होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App