
रामपथ यात्रेसाठी स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून ही ट्रेन सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे आहे.Today Rampath special train left Pune and left for Ayodhya
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय रेल्वेने भगवान रामाशी संबंधित स्थळांना भेट देण्यासाठी रामपथ यात्रा सुरू केली आहे. रामपथ यात्रेसाठी शनिवारी पुण्याहून अयोध्येसाठी विशेष गाडी रवाना झाली आहे. रामपथ यात्रेसाठी स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून ही ट्रेन सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे आहे.
त्याचसोबत यामध्ये ग्रामीण भागातील काठी ठिकाणे ७ दिवस ८ रात्रीसाठी फिरता येणार आहेत. या पॅकेजअंतर्गत रेल्वे प्रवास, धर्मशाळा किंवा सामान्य हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, ऑन-साईट पाहणे आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल.
Maharashtra: Rampath Yatra special train flagged off from Pune to Ayodhya
"Launch of this train is aimed at promoting pilgrimage tourism, covering pilgrim sites in a tour of 7 days & 8 nights. It'll run with sleeper class & AC-3 tier," says DRM Renu Sharma pic.twitter.com/giAIYTIqBO
— ANI (@ANI) November 27, 2021
या ट्रेनमध्ये स्लिपर क्लार आणि एसी-३ टियरचे कोच असणार आहेत.ही ट्रेन २५ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ पर्यंत दररोज धावेल. या पॅकेजअंतर्गत प्रवासी सात रात्री आठ दिवस प्रवास करतील.IRCTC ने राम भक्तांसाठी स्पेशल टुरिस्ट ट्रेन चालवली आहे.
या ट्रेनच्या माध्यमातून प्रवासी रामपथ यात्रा नंदीग्राम, शृंगवरपूर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट मार्गे अयोध्येला पोहोचेल. यासंदर्भात माहिती देत रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दिली.यात्रा अंतर्गत स्लिपर क्लार निवडण्यासाठी प्रति व्यक्ती ७,५६० रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, थर्ड एसी निवडण्यासाठी प्रति व्यक्ती १२,६०० रुपये मोजावे लागतील.