प्रतिनिधी
मुंबई : संपूर्ण देशात उन्हाच्या चटक्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या हिरीरीने मतदान होत असताना दुपारच्या उन्हात महाराष्ट्र झोपला. त्यामुळे मतदानाचा टक्का “विक्रमी” घसरला. दुपारी 3.00 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 42.63 % मतदानाची नोंद झाली. यातले सगळ्यात कमी मतदान पवार काका – पुतण्यांच्या अतिप्रतिष्ठेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात झाले. बारामतीमध्ये फक्त 34.96 % मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक 51.51% मतदान हे कोल्हापुरात झाले. today loksabha 2024 voting percentage after afternoon
* लातूर – 44.48 % * सांगली – 41.30 % * बारामती – 34.96 % * हातकणंगले – 49.94 % * कोल्हापूर – 51.51 % * माढा – 39.11 % * धाराशीव – 40.92 % * रायगड – 41.43 % * रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 44.73 % * सातारा 43.83 % * सोलापूर – 39.54 %
देशातील दुपारी 3.00 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली. महाराष्ट्रात सर्वांत कमी 42.63% मतदानाची नोंद झाली, तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 63.11% मतदानाची नोंद झाली. आसाममध्ये देखील 63.08 % मतदान झाले.
* आसाम 63.08 % * बिहार – 46.69 % * छत्तीसगड – 58.19 % * दादरा नगर हवेली आणि दमण दीव – 52.43 % * गोवा – 61.39 % * गुजरात – 47.03 % * कर्नाटक – 54.20 % * मध्य प्रदेश – 54.09 % * महाराष्ट्र – 42.63 % * उत्तर प्रदेश – 46.78 % * पश्चिम बंगाल – 63.11 %
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App