प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयाबाबत आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी आज (27 मार्च) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विभागीय आयुक्त कार्यालयात आक्षेप आणि हरकतीसोबतच नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.Today is the last day to file objections on Chhatrapati Sambhajinagar name change, big arrangement at Commissionerate
संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर समर्थनार्थ केवळ 4 हजार 166 सूचना आणि 774 पोस्ट कार्ड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात जमा करण्यात आले आहे. शहराचे नाव औरंगाबाद कायम असावे या मागणीसाठी शेवटच्या मुदतीपर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ 2 लाख अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात 25 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App