संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करूनही कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याचे दिसून आले.Today, 22 more employees from Jalgaon division were transferred to the saide
विशेष प्रतिनिधी
जळगाव : गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचारी संपात उतरले आहेत.राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याची अर्थात महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे.संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करूनही कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याचे दिसून आले.
दरम्यान राज्य सरकारने आता कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा बडगा उचलला आहे.राज्य मार्ग परिवहन विभागाच्या जळगाव विभागातील अजून २२ कर्मचाऱ्यांना आज बडतर्फ करण्यात आले आहे.
जळगाव आगारातील ८ व भुसावळ आगारातील १४ कर्मचाऱ्यांचा या बडतर्फीत समावेश आहे. आतापर्यंत एकूण ३५० कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव आगारातील ३५ चालक व ३५ वाहक कामावर हजर झाले असले तरी त्यांची सेवा अतिशय तोकडी पडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App