विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंत्री, आमदार आणि नेते मंडळींना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. अनेकांना कोरोना झाल्याचे दिसून आले. आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोना झाला आहे. To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection
एकनाथ शिंदे यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे म्हंटले आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रातील १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर नेतेमंडळी सर्वाधिक कोरोना बाधित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातून कोरोना संक्रमण जास्त पसरल्याचे स्पष्ट होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App