पुरस्कार टिळकांचा, घेणारे मोदी, उपस्थित राहणार पवार, पण जळफळाट मात्र ठाकरे – राऊतांचा!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुरस्कार देणारे टिळक, घेणारे मोदी, उपस्थित राहणार पवार पण जळफळाट मात्र ठाकरे – राऊतांचा!!, अशी स्थिती आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2023 चा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक परिवाराने या समारंभासाठी शरद पवारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात हा समारंभ होणार आहे.Tilak’s award, Modi who will receive it, Pawar will be present, but Thackeray – Raut!!पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी टिळक परिवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले आहे. लोकमान्य टिळकांनी आयुष्यभर लोकशाही आणि स्वराज्य यासाठी संघर्ष केला. आज ती लोकशाही आणि ते स्वराज्य भारतात अस्तित्वात नसल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला, तर लोकमान्य टिळकांचे चरित्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टिळक कुटुंब त्यांना पाठवणार आहे. कारण लोकमान्य टिळक यांनी लोकशाही आणि स्वराज्यासाठी केलेला संघर्ष हा त्यांनी देखील वाचला पाहिजे, असे खोचक उद्गार संजय राऊत यांनी काढले.

मात्र टिळक पुरस्कार स्वीकारणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान नाहीत. याआधी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग या दोन माजी पंतप्रधानांना टिळक कुटुंबीयांनी लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा टिळक पुरस्कार जाहीर झाल्यावर मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा जळफळाट झाला आहे आणि त्यांनी पंतप्रधान मोदींवर राजकीय टीका करताना त्यामध्ये टिळक कुटुंबीयांनाही ओढले आहे.

नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी रोहित टिळकांनी शरद पवारांची पुण्यातल्या 1 मोदी बाग या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती त्यांचा आणि नरेंद्र मोदींचा थेट संपर्क नसल्यामुळे पवारांनी स्वतः मुलींना फोन करून टिळक पुरस्काराविषयी कल्पना दिली आणि त्यांचा होकार मिळवला होता त्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार जाहीर आणि शरद पवारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. त्यानंतर आज ठाकरे – राऊत यांनी त्याविषयी जळफळाट व्यक्त केला.

Tilak’s award, Modi who will receive it, Pawar will be present, but Thackeray – Raut!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात