प्रतिनिधी
पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेक करण्याचा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना चप्पल फेकू नये, अशी “विनंती” केली आहे, तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता चप्पल फेकणाऱ्या “अज्ञात” व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Throw slippers on Fadnavis’ car
पिंपरी चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर काल चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका “अज्ञात” व्यक्तीने चप्पल फेकली. या “अज्ञात” व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चप्पल फेक केल्याप्रकरणी “अज्ञात” व्यक्तीवर चिखली पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. कलम 336 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आल्याने लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्यासाठी फडणवीसांसह राज्यभरातील अनेक नेते मंडळीही पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
याप्रकरणी काय म्हणाले फडणवीस…
चप्पल फेकण्याच्या या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला असून त्यांना फटकारले. चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतात. अशा शब्दात फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली. स्वतः काही करायचे नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करून दाखवल्याने त्यांच्या मनामध्ये असूया आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अमरावतीत शाई फेकण्याच्या प्रकरणात प्रत्यक्ष तिथे हजर नसलेल्या आमदार रवी राणा निवड 307 कलम नुसार गुन्हा दाखल होतो. तर फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल करणार्यावर कोणता गुन्हा दाखल होतो हे आम्हाला पाहायचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती.
आमदार नितेश राणे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांना 24 तास सुट्टी द्या. मग बघा भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने चप्पल घालतील, असे म्हटले होते.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चप्पल फेकी सारखे प्रकार करू नयेत. विरोध करायचा असेल तर संविधानिक मार्ग अवलंबावे, असे ट्विट आणि विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर आता “अज्ञात” व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App