विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख 66 हजार इतकी आहे.Three thousand diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport
शारजाहून आलेल्या या व्यक्तीने पॅँटमध्ये शिवून हे हिरे आणले होते. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. या माहितीच्या सापळा रचला होता. पुणे विमानतळावर त्यानुसार सर्व प्रवाशांची तपासणी सुद्धा सुरू होती.
हे हिरे 75 कॅरेट वजनाचे असल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे हिरे आपल्या सामानात लपवून ठेवले होते. या प्रकरणी एका जणाला पोलीसांनी अटक केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App