विशेष प्रतिनिधी
बीड : Gyanradha ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी आशिष पद्माकर पाटोदेकर (३२, रा.साऊथ कसबा, दत्त चौक, सोलापूर), यशवंत वसंतराव कुलकर्णी (५४, शिंदेनगर, बीड) व वैभव यशवंत कुलकर्णी (२५, शिंदेनगर, बीड) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.Gyanradha
आरोपींना ४ महिन्यांपूर्वी बीड येथे अटक करण्यात आली होती. त्यांचा ताबा आता आर्थिक गुन्हे शाखेने घेतला. पुढील तपासाच्या दृष्टीने त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१२ टक्के व्याजाचे आमिष
‘ज्ञानराधा’चे संचालक सुरेश कुटे व इतर संचालकांनी मासिक गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून ठेवीदारांना १२ टक्के व्याज परताव्याचे आमिष दिले. मात्र, प्रत्यक्षात रक्कम परत केली नाही. याबाबत फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या घोटाळ्यातील रक्कम २३ कोटी १५ लाखांच्या घरात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App