प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कुर्डूवाडी दौरा करू नका, असा धमकीचा फोन आला. अशी बातमी सोशल मीडियात व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पण खुद्द पवारांनीच असल्या धमकीच्या फोनच्या बातमीचे खंडन केले. Threatening call to Pawar, but Pawar himself denied the news
शरद पवार यांना धमकीचा फोन आला आल्याची बातमी व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी म्हणे पवारांना फोनवरून एकाने दिली. पण या फोननंतरही शरद पवारांनी नियोजित दौरा पूर्ण केला. त्याचवेळी फोन आल्याच्या बातमीचे त्यांनी खंडन केले, असे झी 24 तासच्या बातमीत नमूद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पवारांना आज सकाळी कुर्डुवाडीमध्ये दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी दिली होती. मात्र तरीही ते न डगमगता कुर्डुवाडीच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, फोन करणारी ही व्यक्ती कोण आहे, आणि त्याने ही धमकी का दिली?, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या धमकीच्या फोननंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचे सांगितले गेले. पण नंतर पोलिसांनी त्या बातमीचा इन्कार केला.
धमकीची बातमी व्हायरल झाल्यानंतर पवारांनी ज्या बातमीचा इंकार केलाच आणि त्यानंतर कुर्डूवाडी दौरा पूर्ण करून तेथे पत्रकार परिषद देखील घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App