Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल

Bombay Stock

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bombay Stock  मुंबईतील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) फिरोज टॉवर इमारतीला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला असून, सोमवार दुपारी ३ वाजता स्फोट होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.Bombay Stock



धमकीचा हा ईमेल बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर प्राप्त झाला. रविवारी कार्यालय बंद असल्याने हा ईमेल एका अधिकाऱ्याच्या निदर्शनास सोमवारी आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू केली. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर कायद्याच्या ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३) आणि ३५१(४) कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Threat to blow up Bombay Stock Exchange building; Police launch search operation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात