आम्ही बंगालमध्ये घुसून ममता दीदींना धडा शिकवू’, असंही विधान नवनीत राणांनी केलं आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Navneet Rana पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात देशभरात संताप आहे. बंगालमध्ये हिंदूंवरील हिंसाचारावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.Navneet Rana
त्या म्हणाल्या की, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत, जर तुम्ही इतिहासाची पाने चाळली तर तुम्हाला हेच दिसेल, जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, जेव्हा जेव्हा राजकारण झाले तेव्हा तेव्हा हिंदू विचारसरणीच्या लोकांवर फक्त अत्याचार झाले. हिंदू मुलींवर बलात्कार झाले, त्यांची घरे जाळली गेली, त्यांचे व्यवसाय बंद पडले.
नवनीत राणा म्हणाल्या की, २०१४ नंतर ममता दीदींना हा गैरसमज आहे की ज्या पद्धतीने त्या पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशसारखे चित्र निर्माण करण्याचा विचार करत होत्या, परंतु त्या विसरल्या की आज या देशात बसलेले पंतप्रधान रामभक्त आहेत, तुमच्या काँग्रेसच्या काळात ते सर्व काही होत होतं, पण आता हे बंगालमध्ये चालणार नाही. जर अशी गरज निर्माण झाली तर आमच्यासारखे विचारसरणीचे लोक स्वतः जाऊन ममता दीदींना धडा शिकवतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App