आजची सुनावणी संपली; शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनीही आक्रमकपणे मांडली बाजू
प्रतिनिधी
महाराष्ट्राच्य सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी जोरदार युक्तीवाद केला. This court cannot recall the resigned Chief Minister Harish Salve lawyer of Shinde group, strongly argued in the Supreme Court
”बहुमताची मोजणी राजभवनात होऊ शकत नाही, ती विधानसभेतच व्हायला हवी. उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी पाचारण करून राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे द्याच पण अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी विहित कालावधी देखील द्या, अशी मागणी हरीश साळवे यांनी केली. तसेच, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना स्वीकारावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं. बहुमत बळाच्या जोरावर झालं, असं कसं म्हणता येईल? जोपर्यंत अपात्र होत नाहीत, तोपर्यंत आमदार काम करू शकतात. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. राजकीय पक्षाचं अस्तित्वच विधिमंडळ पक्षावर अवलंबून असतं. नेत्याला प्रश्न विचारणे म्हणजे बंड नाही. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो. अशा स्थितीत जर पक्षनेत्याला त्यांनी सवाल विचारले तर त्यांचं चुकलं कुठे?” असं ते म्हणाले.’
सौर ऊर्जा फिडरचा शेतकऱ्यांना मोठा लाभ, दिवसाही देणार वीज; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
याशिवाय शिंदे गटाकडून वकील नीरज कौल यांनीही युक्तिवाद केला. ‘’उद्धव ठाकरेंना माहिती होतं की त्यांच्या कडे बहुमत नव्हतं. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव घेण्याच्या दिलेल्या अंतरिम आदेशानंतर १० मिनिटांत त्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांसमोर आलेल्या माहितीनुसार जर त्यांनी निर्णय घेतला असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? जर ४० हून जास्त सदस्यांनी सांगितलं की आमचा सरकारवर विश्वास नाही, तर सरकारकडे बहुमत नसल्याचं याहून चांगलं निदर्शक कुठलं असू शकतं?’’ असं ते म्हणाले. याचबरोबर, ‘’राज्यपाल फक्त त्यांच्याकडे आलेल्या माहिती किंवा पुराव्यांवरच निर्णय घेऊ शकतात. ते निवडणूक आयोगाप्रमाणे यामध्ये चौकशीचे आदेश देऊ शकत नाहीत. जर बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा काढला असेल, तर राज्यपालांसमोर पुराव्यांवर आधारित निर्णय घेण्याशिवाय अजून कोणता मार्ग राहातो?’’ असा प्रश्नही कौल यांनी उपस्थित केला.
यानंतर महेश जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर शिंदे गटाची बाजू मांडली आणि शेवटी मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना आधीच्या काही खटल्यांचा दाखला सर्वोच्च न्यायालयाला दिला. शिंदे गटाकडून मनिंदर सिंग यांचा आजचा शेवटचा युक्तिवाद संपला असून आता तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू होईल. ११ ते १२ तुषार मेहता बाजू मांडणार असून त्यानंतर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App