हे सत्तेच्या नादात इतके मशगुल आहेत की त्यांना गरीब कामगारांकडे पाहायला वेळ नाही ; प्रविण दरेकरांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, ”गेंड्याच्या कातडीच हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत. एक-दोन महिने झाले तरी सरकार कर्मचाऱ्यांचा कुठलाच सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. They are so preoccupied with power that they have no time to look at poor workers; Pravin Darekar criticizes Mahavikas Aghadi government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीच्या विलीनीकरणासाठी गत दीड ते दोन महिन्यांपासून संप सुरु आहे. यावरुन विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, ”गेंड्याच्या कातडीच हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत. एक-दोन महिने झाले तरी सरकार कर्मचाऱ्यांचा कुठलाच सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही.पुढे प्रवीण दरेकर यांनी पुढे असा सवाल केला आहे की, जर केंद्र सरकार कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता शेतकऱ्यांसाठी चार पावले मागे येऊन कृषी कायदा रद्द करु शकत असेल तर मग तुम्हांला कुठला अभिमान आलाय?”

दुसऱ्या ट्विटमध्ये दरेकर म्हणाले, ”सहकार मंत्री बाळासाहेब थोरात हे सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री आहेत.तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सुख-दु:ख, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. पण हे सत्तेच्या नादात इतके मशगुल आहेत की त्यांना गरीब कामगारांकडे पाहायला वेळ नाही. पुढे दरेकर म्हणाले की , कष्टकरी जनताच सत्तेवर बसवते, जनतेने जर शिव्या-शाप दिल्या तर सत्तेवरुन खाली यायला देखील वेळ लागणार नाही.” अशी टीका दरेकरांनी केली आहे.

They are so preoccupied with power that they have no time to look at poor workers; Pravin Darekar criticizes Mahavikas Aghadi government

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात