शरदनिष्ठ राष्ट्रवादी अधिकृत नाही; अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या मूळ राष्ट्रवादीत फूट नाही, प्रफुल्ल पटेलांचा पत्रकार परिषदेत दावा


प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत नाही. मूळ राष्ट्रवादीत फुटत पडलेली नाही. ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अखंड आहे, असा दावा अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राजधानी नवी दिल्लीत शरदनिष्ठ राष्ट्रवादीची गुरूवारी झालेली बैठक ही अनधिकृत होती, त्या बैठकीला कोणताही अर्थ नाही, असा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला.There is no division in the original nationalists under the leadership of Ajitdad, Praful Patel claimed in a press conference

प्रफुल्ल पटेल यांनी 30 जून पासूनचा सर्व घटनाक्रम विस्ताराने मांडला. पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रवादीत गेले कित्येक वर्ष निवडणूकच झालेल्या नाहीत निवडणूक आयोगाच्या दृष्टीने हा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.



राष्ट्रवादीतला घटनाक्रम

काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असून त्यामाध्यमातून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आपल्यासोबत असून पक्ष आपलाच असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

30 जूनला अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. त्यात अनेक लोक उपस्थित होते. अनेक आमदारही यावेळी उपस्थित होते, बहुतांश पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते. त्यावेळी सर्वानुमते अजित पवारांना आपला नेता म्हणून घोषित करण्यात आले.

त्यानंतर दोन-तीन गोष्टी करण्यात आल्या. प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. विधानसभा अध्यक्षांना अजित पवार गटनेते आहेत, असे सूचित करण्यात आलं. अनिल पाटील प्रतोद असतील असेही सूचित करण्यात आले. विधान परिषदेच्या सभापतींनाही अमोल मिटकरी हे परिषदेतील प्रतोद असतील असे सूचित करण्यात आले. त्याच दिवशी निवडणूक आयोगाला आमदार आणि सदस्यांच्या प्रतिज्ञापत्रांसह अर्ज देण्यात आला. निवडणूक आयोगापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे.

आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं पाहिजे अशी मागणी आयोगाला केली, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पक्षाचं बहुमत अजित पवारांच्या पाठिशी असल्याचा अर्ज आम्ही 30 जूनला दाखल केला.

दिल्लीतील बैठक अनधिकृत

गुरूवारी सहा जुलै 2023 रोजी नवी दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांनी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले.

त्या बैठकीवरच प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, “काल दिल्लीत एक बैठक झाली, त्याला दुसरं काही नाव देणार नाही. पण ती अधिकृत बैठक नाही. अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असून राष्ट्रवादीच्या घटनेनुसारच सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. आमच्या पक्षाची राज्याच्या निवडणुकीची प्रक्रिया अजून सुरूच आहे. सुप्रिम कोर्टाने शिवसेनेसंदर्भात आताच एक निकाल दिला आहे, ज्यात कोर्टाने राजकीय आणि विधीमंडळ पक्ष एकच आहे असं म्हणणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे.”

जयंत पाटील यांची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसार नाही, त्यामुळे ते नियुक्त्या करू शकत नाहीत. कालच्या बैठकीत घेतलेले निर्णय हे कोणालाच लागू होत नाहीत. कोण कोणाला काढू शकेल हा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. त्यांच्याकडून ज्या कारवाई करण्यात आल्या आहेत त्या अवैध आहेत.

आम्ही भांडत बसणार नाही, त्याचा कुणालाच फायदा होणार नाही. कोणतंही अशोभनीय काम आम्ही करणार नाही. आम्ही नियमानुसार आमची कारवाई करणार. पक्ष आमच्याकडे आहे, आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत.

There is no division in the original nationalists under the leadership of Ajitdad, Praful Patel claimed in a press conference

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात