पोलीस निरीक्षक बदलीच्या वादातून शिवसेना-भाजपमध्ये कल्याण मध्ये ठिणगी; पण राजीनाम्याच्या तयारीचा डॉ. श्रीकांत शिंदेंचा खुलासा

प्रतिनिधी

मुंबई : 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपने लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदार संघासाठी निवडणूक प्रमुख नेमल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला टाकून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केल्याच्या बातम्या आणि विश्लेषण मराठी माध्यमांनी केली आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या उच्चपदस्थ सूत्रांचा हवाला दिला आहे. There are no disputes between Shiv Sena-BJP, but someone will have a stomach ache. Disclosure of Srikant Shinde

परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेल्यास आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना – भाजप युती म्हणूनच लढवण्याचा निर्णय झाला आहे, तरी देखील शिंदे – फडणवीस यांच्यात आणि शिवसेना-भाजप युती यांच्यात मतभेदाच्या ठिणग्या पडल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालवल्या आहेत.

त्यातही कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शिंदे यांचे काम करायचे नाही, असा ठराव राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थानिक बैठकीत झाला. स्थानिक वादातून मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली हा विषय शिवसेना आणि भाजप मधला वादाचा ठरला आहे. त्यांची जोपर्यंत बदली होत नाही, तसेच भाजपचे स्थानिक नेते आणि मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यांचा हा त्यांच्यावर अन्याय आहे, तो अन्याय दूर होईपर्यंत शिवसेनेचे काम करायचे नाही असा ठराव मंजूर झाला. हा ठराव मंजूर होणे ही गंभीर बाब असल्याचे निरीक्षण स्वतः रवींद्र चव्हाण यांनी नोंदविले. तसेच ते आगरी कोळी समाजाच्या वारकरी भवनाच्या भूमिपूजनाला देखील हजर नव्हते.



या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट खुलासा केला आहे. शिवसेना – भाजप युतीमध्ये अजिबात वाद नाहीत. उलट 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कसोशीने प्रयत्न करतील, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे, तर युतीच्या कामातून कोणाला पोटदुखी होत असेल, तर श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दाखविली आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे ट्विट असे :

२०२४ साली मा. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना – भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना – भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू.

केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे .

– डॉ. श्रीकांत शिंदे , खासदार

There are no disputes between Shiv Sena-BJP, but someone will have a stomach ache. Disclosure of Srikant Shinde

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात