विशेष प्रतिनिधी
जालना : ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्व लोकांचे लक्ष लागून राहिले होते. आता राजेश टोपे यांनी यावर विधान केले आहे. टोपे म्हणतात, राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाहीयेत. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉन मुळे 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या बाबतीत निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानुसारच घेतला जाईल. असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
There are currently no new restrictions in the state; State Health Minister Rajesh Tope
आज 10 डिसेंबर रोजी केंद्रीय औषध मानक तज्ज्ञ संस्थेची विशेष बैठक होणार होती. या बैठकीमध्ये लहान मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार होते. असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. फ्रंटलाइन वर्कर्सना बुस्टर डोस देण्यासंदर्भात मध्येदेखील महत्त्वाची भूमिका संस्थेने घ्यावी अशी मागणी देखील टोपे यांनी जालना येथे बोलताना यावेळी केली आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर महाराष्ट्र सतर्क, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले- पुढच्या एक-दोन दिवसांत येतील नवीन गाइडलाइन्स!
ओमायक्रॉन या विषाणू संदर्भात माहिती देताना टोपे यांनी सांगितले की, परदेशातून राज्यात आलेल्या सर्व व्यक्तींचा पोलिसांच्या साहाय्याने शोध घेणे चालू आहे. या सर्व व्यक्तींना शोधून, त्यांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्स चाचणी देखील केली जाणार आहे. अशी त्यांनी माहिती दिलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App