दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??

Pune Zilla Parishad

नाशिक : महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निकालांमुळे समोर आला आहे.The two Pawans will come together, but will they go beyond the Pune Zilla Parishad?

– महापालिका निवडणुकीत दारुण पराभव

दोन पवारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांची निवडणूक लढवली परंतु, प्रत्यक्षात त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनच महापालिकांमध्ये खरी युती केली. इतरत्र त्यांनी मित्रत्वाची लढाई केली. त्याचबरोबर दोन्ही पवारांनी म्हणजेच दोन्ही पवारांच्या नेत्यांनी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनच महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले होते. पण तरीसुद्धा ते दोन्ही महापालिका निवडणुका हरले. 2017 पेक्षा 2026 चा त्यांचा पराभव जास्त मोठा आणि जिव्हारी लागणारा होता. कारण 2017 मध्ये अखंड राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी विरोधी पक्षात होती. त्यावेळी पवार काका – पुतणे एकाच पक्षातून निवडणुकीला सामोरे गेले होते. पण 2026 मध्ये अजित पवार सत्तेमध्ये, तर शरद पवार विरोधात, तरी देखील निवडणुकीत दोघे एकत्र असे चित्र होते. पण निवडणुकीचा निकाल समान होता तो पराभवाचा होता.



 

आता जिल्हा परिषदा निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही पवार एकत्र होतील अशा चर्चा सुरू झाल्यात. तशा भेटीगाठी पण सुरू झाल्यात. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या चर्चा झाली. रोहित पवार आणि अजित पवार यांच्याच चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले. तशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.

– फक्त दोन ठिकाणी लढले आणि पडले

पण यातूनच एक सवाल समोर आला, तो म्हणजे दोन्ही पवार जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकत्र येतील पण ते पुणे जिल्ह्याच्या पलीकडे जातील का??, हा तो सवाल होय. कारण दोन्ही पवारांनी एकत्र येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनच महापालिकांच्या निवडणुका खऱ्या अर्थाने लढल्या. त्यापलीकडे अजित पवार फारसे प्रचाराला देखील गेले नाहीत. एकाच दिवसात त्यांनी तीन चार महापालिकांचा प्रचार उरकून ते पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच प्रचाराला लागले होते. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी फारच निवडक ठिकाणी पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच प्रचार केला होता. त्यापलीकडे ते दोघेही नेते प्रचाराला सुद्धा गेले नव्हते.

– पश्चिम महाराष्ट्रात ताकद हा इतिहास

अशा स्थितीत दोन्ही पवार एकत्र आल्यानंतर 12 जिल्हा परिषदांमध्ये जाऊन प्रचार करणार की फक्त पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करणार??, हा खरा सवाल आहे. कारण पवारांची ताकद पश्चिम महाराष्ट्र पुरती मर्यादित होती. त्यातही ग्रामीण भागात मर्यादित होती. हा इतिहास झाला. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्हा परिषदांमध्ये त्यांची सत्ता होती किंवा ते सत्तेत तरी सहभागी होते. पण 2017 नंतर भाजपने पुणे सोडून बाकी सगळ्या जिल्हा परिषदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांमधली पवारांची ताकद पूर्णपणे घटून ती भाजपमध्ये समाविष्ट झाली होती.

– एकाकी लढत

2026 च्या निवडणुकांमध्ये पवारांना एकाकीपणे एक जिल्हा परिषदांमध्ये लढायला लागणार आहे. पण आधीच्या ताकदीचे नेतेच त्यांच्याकडे उरलेले नाहीत त्यामुळे पवार एकत्र येऊन सगळीकडे आपली ताकद लावणार की फक्त पुणे जिल्हा परिषदेपुरती ताकद लावून ही जिल्हा परिषद आपल्याकडे टिकवून ठेवणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The two Pawans will come together, but will they go beyond the Pune Zilla Parishad?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात