महाविकास आघाडीचे इतर मंत्री सोबत नसताना अल्पंसख्यांक मंत्री नबाब मलिक रेमेडिसीवरून आकांडतांडव करत आहेत. यामागचे कारण त्यांच्याच तोंडातून पुढे आले आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यामुळे केंद्र सरकारवर नबाब मलिक यांची आगपाखड सुरू आहे.The truth came out of the mouth of Nawab Malik, the arrest of his son-in-law Sameer Khan set the center on fire
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे इतर मंत्री सोबत नसताना अल्पंसख्यांक मंत्री नबाब मलिक रेमेडिसीवरून आकांडतांडव करत आहेत. यामागचे कारण त्यांच्याच तोंडातून पुढे आले आहे.
मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यामुळे केंद्र सरकारवर नबाब मलिक यांची आगपाखड सुरू आहे.नबाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये रेमडेसिवर इंजेक्शनचा विषय मांडताना मलिक यांनी स्वत:हून आपल्या जावयाचा उल्लेख केला. केंद्र सरकारच्या एजन्सीने त्यांना अटक केल्यामुळे आपण आरोप करत नाही याचे न मागता स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली. त्यामुळे उलट मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांमागचे कारण समोर येऊ लागले आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक मिळत आहे. केवळ गुजरात राज्यालाच रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करणाºया निर्यात कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे, असे मलिक यांनी म्हटले होते.
मात्र, त्यानंतर हा आरोप चुकीचा असल्याचे सिध्द झाले होते. शिवसेनेने तर मलिक यांचा आरोप फेटाळून लावला. कॉँग्रेसने त्यांना साथ दिली नाही. राष्ट्रवादीचाही कोणी मंत्री त्यांच्यासोबत राहिला नाही.
त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ते एकटे पडले असल्याचे दिसून आले आहे. मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत.
ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App