विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा भारतीय लष्कराला सामर्थ्यशाली बनवित आहे. नौदलाच्या शस्त्रसंभारात संपूर्ण भारतीय बनावटीच्या पाणबुडीची पाणबुडीची भर पडली आहे. माझगाव डॉकने कलवरी वगार्तील चौथी पाणबुडी नौदलाकडे सुपुर्त केली.The success of Make in India, an all-India-built submarine will enhance the strength of the Navy
भारतीय नौदलात आयएनएस कलवरी, खांदेरी, करंज या पाणबुड्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या चौथ्या पाणबुडीचे आयएनएस वेला असे नामकरण केले जाणार आहे. लवकरच आयएनएस वेला नौदलात दाखल होण्याचा सोहळा नौदलातर्फे पार पडला जाईल.
आयएनएस वेला या पाणबुडीच्या बांधणीला साधारण २०१७ मध्ये सुरुवात झाली, ६ मे २०१९ ला या पाणबुडीचे जलावतरण झाले. यानंतर सुरुवातीला किनाऱ्या जवळ चाचण्या आणि त्यानंतर खोल समुद्रातील चाचण्या घेण्यात आल्या. करोना काळातही या चाचण्यांमध्ये खंड पडला नाही. सखोल चाचण्यांनंतर, सर्व उपकरणांची तपासणी केल्यानंतरच नौदलाने ही पाणबुडी स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पाणबुडीची बांधणी करणाºया माझगाव डॉकतर्फे आज आयएनएस वेला ही नौदलाकडे सुपुर्त करण्यात आली आहे.
डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालणाऱ्या कलवरी वगार्तील पाणबुड्या या जगात उत्कृष्ठ समजल्या जातात. फ्रान्स देशाच्या स्कॉर्पिन पाणबुडीच्या तंत्रज्ञानावर आधारीत कलवरी वगीर्तील पाणबुड्यांची निर्मिती माझगाव डॉकमध्ये सुरु आहे. फ्रान्स देशासोबत २००५ मध्ये पाणबुड्या बांधण्याबाबत तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार झाला होता. कलवरी वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे.
प्रोजेक्ट 75 या प्रकल्पाअंतर्गत भारतीय नौदलात एकूण सहा पाणबुड्यांचा समावेश होणार आहे.आयएनएस वेला या पाणबुडीची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये फ्रान्सच्या साहाय्याने करण्यात आली आहे. स्कॉर्पिन श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी’ चे जलावतरण २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आयएनएस खांदेरी’ आणि ‘आयएनएस करंज’ या दोन पाणबुड्यांचेही यापूर्वीच जलावतरण झाले आहे.
पाचव्या आणि सहाव्या आयएनएस वागीर आणि आयएनएस वागशीर या आणखी दोन पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम सुरु आहे. भारताने या पाणबुड्यांची निर्मिती मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू केली आहे. युद्धामध्ये सर्व अडचणींवर मात करत शत्रूला चकवा देत आपल्या लक्ष्यावर मारा करीत सुरक्षितपणे परत येण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे. भारतीय नौदलात या पाणबुड्यांचा समावेश झाल्याने नौदल अधिक शक्तिशाली होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App