पुण्यात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्यास काळीमा फासणारी घटना उघडकीस
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक अशी घटना पुण्यातील लोणीकाळभोर भागात उघडकीस आली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यपिकेचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो रेकॉर्ड करून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तब्बल पाच हजार अमेरिकन डॉलर्सची मागणी केली आहे. The student threatened to spread obscene videos and photos of women professors and demanded an extortion of lakhs
याप्रकरणी प्राध्यापिकेने आरोपी विद्यार्थ्याविरोधात हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मयांक सिंग(मूळ रा. बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने प्राध्यपिकेशी सतत संपर्कात राहून मैत्री वाढवण्याचे नाटक करत, व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल करून मी सांगतो तसे न केल्यास तुमची बदनामी करेन अशी धमकी दिली. शिवाय, संबंधित प्राध्यपिकेस विविस्त्र होण्यास भाग पाडून ते फोटो व व्हिडीओ त्यांच्या पतीस बनावट इन्स्टाअकाउंटवरून पाठवले आणि पाच हजार यूएस डॉलर्सची मागणी करत, पैसे न दिल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर संबंधित विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App