महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुकीचे हब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी कनेक्टिकटचे गव्हर्नर नेड लॅमांट यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेतली. नवी मुंबईत नवीन ‘एज्युसिटी’ निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्य मदत करणार आहे. यावेळी ‘एज्युसिटी’ उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुकीचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. देशातील डेटा सेंटर क्षमतेच्या 60टक्के क्षमता राज्यात आहे. राज्याला 2030 पर्यंत 1 हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.
नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे, या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रो, नवीन विमानतळ, आंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस कनेक्टिकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, कनेक्टिकट विद्यापीठाचे अध्यक्ष आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App