• Download App
    Pawar Family सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??

    सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??

    नाशिक : सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??, असे विचारायची वेळ शरद पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी आली.

    मूळात शरद पवारांना आपल्या कुटुंबीयांसाठी स्नेहभोजन ठेवावे लागले हीच मोठी बातमी ठरली. अन्यथा आत्तापर्यंत शरद पवारांनी अनेक स्नेहभोजने राजकीय कारणांसाठी आयोजित केली आणि इतरांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ते हजर देखील राहिले. एरवी पवार कुटुंबीयांचा एकत्रित कार्यक्रम म्हणजे दिवाळीचा पाडवा असायचा. त्यादिवशी शरद पवारांसह सगळेच पवार बारामतीतल्या गोविंद बागेमध्ये एकत्र यायचे आणि पवार कुटुंबीयांच्या ऐक्याचे दर्शन आपोआप घडायचे.

    दिवाळी पाडवे वेगळे झाले

    पण अजित पवार आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दिवाळीच्या पाडवा देखील दुभंगला होता. अजित पवारांनी स्वतःची वेगळी राज राजकीय वाटचाल सुरू केल्यानंतर दिवाळीच्या पाडव्यासाठी पवार कुटुंब एकत्र झाल्याचे कधी दिसले नाही. उलट शरद पवार हे गोविंद बागेत दिवाळीचा पाडवा कार्यक्रम घेत राहिले, तर अजित पवार हे सहयोग सोसायटीत पाडव्यानिमित्त लोकांना भेटत राहिले होते. म्हणजेच पवार कुटुंब दिवाळीत सुद्धा दुभंगलेले दिसले होते. शरद पवारांचे कुटुंब वेगळे आणि अजित पवारांचे कुटुंब वेगळे हे चित्र दोन वर्षांपासून निर्माण झाले होतेच.

    पवार कुटुंबांमधले मतभेद

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर पवार कुटुंबातला हा राजकीय दुभंग जास्तच विस्तारला. अगदी सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबातले राजकीय मतभेद शरद पवारांच्या नातवंडांच्या तोंडी बाहेर आले. २०२९ बारामती विधानसभा निवडणूक अथवा लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होईल अशी वक्तव्ये जय पवार आणि रोहित पवार यांनी केली. त्यामुळे पवार कुटुंबीयांचे मतभेद जाहीरपणे समोर आले. पण हे असे घडणे श्रीनिवास पवारांना आवडले नाही त्यामुळे त्यांनी शरद पवार लवकरच दोन्ही नातवांना बोलवून समजावून सांगतील, असे वक्तव्य याच दिवशी केले होते.

    सुनेत्रा पवार गैरहजर

    या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपले पुण्यातले निवासस्थान १, मोदी बाग इथे पवार कुटुंबीयांसाठी स्नेहभोजन आयोजित केले. या स्नेहभोजनाला पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि बाकीचे काही पवार हजर राहिले. या सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. पण या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हजर राहिल्या नाहीत. त्या त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहिल्या नाहीत. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे यांनी देवगिरी निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.

    सुनेत्रा पवारांच्या मुंबईत बैठका

    ज्यावेळी शरद पवारांनी स्नेहभोजन आयोजित केले त्याच दरम्यान सुनेत्रा पवार या मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात अल्पसंख्यांक मंत्रालय आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाच्या बैठकांमध्ये मग्न होत्या. त्यांनी या दोन्ही बैठकांसंदर्भातली ट्विट आपल्या सोशल मीडिया हँडलवरून केली.

    स्नेहभोजनाचा उपयोग काय??

    शरद पवारांनी ज्या कारणांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते, त्याची चर्चा माध्यमांमध्ये खूप रंगली. ती अगदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणापर्यंत पोहोचली, पण खुद्द सुनेत्रा पवारच त्या स्नेहभोजनाला हजर राहिल्या नव्हत्या. त्यामुळेच मोदी बागेत झालेले स्नेहभोजन हे पवार कुटुंबांमधले मतभेद कमी करण्यासाठी उपयुक्त ठरले का?? किंबहुना पवारांच्या कुटुंबांमधल्या मतभेदाच्या भेगा बुजविण्यात शरद पवार यशस्वी ठरले का??, हे सवाल समोर आले.

    The ‘Snehabhojan’ at Modi Baug: Cracks Revealing Rifts within the Pawar Family

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sadavarte : परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा

    त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे पिंपरीत भूमिपूजन; आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश!!

    अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचा विकास, पर्यटन आणि वारसा संवर्धनाला चालना; 681 कोटी रुपयांची तरतूद