• Download App
    Mumbai-Pune Missing Link मुंबई - पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या सेवेसाठी खुला; घाटातल्या वाहतूक कोंडीला कायमचा आळा!!

    मुंबई – पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या सेवेसाठी खुला; घाटातल्या वाहतूक कोंडीला कायमचा आळा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.

    देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळत असून, अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून भारत जागतिक स्तरावर वेगाने पुढे जात आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही विकासाची ही गती कायम ठेवत, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.



    प्रवासाच्या वेळेत अर्धा तासाची बचत

    मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत सुमारे २० ते ३० मिनिटांची बचत होणार असून, घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. परिणामी प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल – फ्री होणार आहे. मुंबई – पुणे नव्हे, तर राज्याच्या आर्थिक गतीला चालना देणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प येत्या १ मे २०२६ रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे.

    उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. समृद्धी महामार्ग आणि आता मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्प यांसारख्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशात आणि जागतिक पातळीवरही महाराष्ट्राची ओळख अधिक ठळक होत आहे.

    खासदार श्रीकांत शिंदे यांनी या जागतिक दर्जाच्या वाहतूक प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.

    Mumbai-Pune Missing Link Opens for Public Service on Maharashtra Day

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sadio Camara : मालीचे संरक्षण मंत्री सादियो यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू; काल घरी आत्मघाती कारने हल्ला केला

    Swiss Air Flight : दिल्लीत टेकऑफ दरम्यान स्विस विमानाचे इंजिन फेल, आग लागली; 6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 जण होते स्वार

    PM Modi : मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित; ममता सरकारच्या राजवटीत ‘माँ-माटी, मानुष’चा सन्मान नाही