• Download App
    Govinddev Giri Maharaj! गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!

    गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना तीन दिवसांची संधी मिळणार असून येत्या १ मे ते ३ मे २०२६ असा तीन दिवसांचा कार्यक्रम वसंत व्याख्यानमाला आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केला आहे.

    आजच्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात भगवान बुद्धांचे जीवन आणि त्यांनी दिलेला शांतीचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तथागतांनी मानवाला मध्यम मार्ग दाखविला. शांती, अहिंसा करुणा आणि समतेचा संदेश दिला.



    भगवान बुद्धांची कथा केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे वर्णन नसून त्याद्वारे मानवी मनाचा शोध घेऊन मूल्याधिष्ठित जीवनाकडे नेणारी दिशा दाखविणारी आहे. गोविंददेव गिरी महाराजांच्या रसाळ वाणीतून आणि त्यांच्या प्रगल्भ विवेचनातून श्रोत्यांना आत्मपरिवर्तनाची प्रेरणा मिळेल.

    १ मे ते ३ मे अशा तीन दिवसांमध्ये गोदावरी घाटावर यशवंत महाराज पटांगणात सायंकाळी ६.०० ते ८.०० ही तथागत कथा होईल. संस्कार संस्कृती आणि पर्यावरणाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या सोहळ्यात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जयंत गायधनी, राजेंद्र गायकवाड आणि संजय साळवे यांनी केले आहे.

    ‘Tathagata Katha’ directly from the lips of Govinddev Giri Maharaj!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Data Localization : वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर पाठवण्यावर बंदी; देशातच रेकॉर्ड साठवले जाईल, दूरसंचार क्षेत्रात परवाना राजवट संपली; आता ऑनलाइन मंजुरी मिळेल

    NCERT : NCERT ने अभ्यासक्रमात 1975-1977 आणीबाणी विभाग समाविष्ट केला; इयत्ता 9वीला शिकवले जाईल; NEP 2020 अंतर्गत अभ्यासक्रमात बदल

    Indian Passport : 1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल; सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क