• Download App
    Mamata Banerjee ममतांच्या प्रचारासाठी फक्त केजरीवाल; बाकीचे प्रादेशिक नेते गपगार!!

    ममतांच्या प्रचारासाठी फक्त केजरीवाल; बाकीचे प्रादेशिक नेते गपगार!!

    नाशिक : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत ममता बॅनर्जींनी अक्षरशः एकाकी प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात त्यांच्या प्रचारात अरविंद केजरीवाल सामील झाले, पण बाकीचे प्रादेशिक नेते अक्षरशः गपगार राहिले. अरविंद केजरीवाल बघायचा बाकी कुठलाही प्रादेशिक नेता पश्चिम बंगाल कडे फिरकला सुद्धा नाही.

    एकीकडे ममता बॅनर्जी प्रचंड शक्तिशाली भाजप बरोबर टक्कर घेत असताना दुसरीकडे राहुल गांधींनी ममता बॅनर्जी यांचीच शक्ती खच्ची करायचा डाव खेळला. त्यांनी आपल्या प्रत्येक भाषणात भाजप विजयी होणार असल्याची अप्रत्यक्ष खात्री दिली. प्रत्येक भाषणात त्यांनी ममता बॅनर्जींना वैयक्तिक पातळीवर टार्गेट केले.

    – स्टालिन फक्त तामिळनाडू पुरते

    पण ममता बॅनर्जींच्या बचावासाठी एकही प्रादेशिक नेता पुढे आला नाही. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बसून ममता बॅनर्जींना परस्पर पाठिंबा जाहीर करून टाकला. त्यानंतर ते एक शब्दही बोलले नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन स्वतःच्याच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात मग्न असल्याने त्यांनी पश्चिम बंगाल कडे फिरकणे शक्यच नव्हते. पण तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान संपुष्टात आल्यानंतर सुद्धा स्टालिन पश्चिम बंगाल कडे फिरकले नाहीत. त्यांनी पश्चिम बंगाल मधल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी ममता बॅनर्जींचा प्रचार केला नाही.

    – उत्तर प्रदेश आणि बिहार मधले यादव गप्प

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते चंद्रशेखर राव यापैकी कोणीही पश्चिम बंगालमध्ये येऊन ममता बॅनर्जींचा प्रचार केला नाही.



    मायावती या कधीच कुठल्या प्रादेशिक नेत्याच्या किंवा राष्ट्रीय नेत्याच्या पाठीशी उभ्या राहात नाहीत. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये येऊन कोणाच्या बाजूने प्रचार करणे संभवतच नव्हते त्यामुळे त्यांनी ममता बॅनर्जींच्या बाजूने प्रचार केला नाही यात आश्चर्य वाटण्यात येते काही घडले नाही.

    – पवार कुटुंबीयांची ममतांकडे पाठ

    शरद पवार प्रकृती बरी नसल्यामुळे त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जाणे शक्यच नव्हते. सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातच स्वतःच्या पक्षाचा धडपणे प्रचार केल्याचे दिसले नव्हते. त्या बारामतीतल्या पोटनिवडणुकीत सुद्धा प्रचारासाठी फिरल्या नव्हत्या. त्या फक्त सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेला हजर राहून भाषण करून निघून गेल्या. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांनी पश्चिम बंगाल मध्ये जाऊन प्रचार करणे ही गोष्ट राजकीय दृष्ट्या अशक्यप्रायच होती. ती तशीच घडली सुप्रिया सुळे पश्चिम बंगाल कडे फिरकल्याच नाहीत. त्यांनी फक्त पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मोठ्या धीराने लढत आहेत, अशी भाषा वापरली. त्या पलीकडे सुप्रिया सुळे यांनी दुसरे काही केले नाही.

    – फक्त केजरीवालाच ममतांच्या मदतीला

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हेच फक्त ममता बॅनर्जी यांच्या प्रचारात सामील झाले. त्यांनी रोड शो मध्ये भाग घेतला. काही सभांना संबोधित केले. पण वर उल्लेख केलेल्या बाकी कोणत्याही नेत्याने ममता बॅनर्जींना तोंडी पाठिंबा देण्याशिवाय बाकी कुठलीही राजकीय मदत केली नाही.

    त्यापैकी प्रत्येक नेत्याला लोकशाही धोक्यात आल्याचा भास प्रत्येक निवडणुकीत झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला, पण ममता बॅनर्जी भाजपशी आणि मोदींशी एकाकी टक्कर घेत असताना यापैकी कुठलाही नेता त्यांच्या मदतीसाठी पश्चिम बंगाल कडे फिरकला नाही.

    दिल्लीत अरविंद केजरीवालांचा पाडाव झाला. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार धोक्यात आहे. त्यावेळी केजरीवालांच्या मदतीला बाकीचे प्रादेशिक नेते हातचे राखून समोर आले होते. पण ममता बॅनर्जी यांच्या वाट्याला तेवढे सुद्धा राजकीय सौजन्य आले नाही.

    Only Arvind Kejriwal helped Mamata Banerjee

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    इराणनेच फाडला पाकिस्तानी मध्यस्थीचा बुरखा; इराणी परराष्ट्रमंत्री मदत मागण्यासाठी गेले रशियाला; डोनाल्ड ट्रम्पचा पापड मोडला!!

    Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही; कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो- धीरेंद्र शास्त्री

    Kalpanaraje Bhonsle : मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकणे धोक्याची घंटा, NCERTच्या निर्णयावर कल्पनाराजे भोसलेंचा संताप