प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी काढली होती, पण यू टर्न घेत त्यांनी पावित्रा बदलला. आता पोलीसच फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन चौकशी करणार आहेत. The police will go to his house, not the Fadnavis police station
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याच्या तपासात फडणवीस यांनीही चौकशी केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांची नोटीस जारी करण्यात आली होती. बीकेसी पोलीस ठाण्यात रविवारी, 13 मार्च रोजी 11 वाजता हजर राहण्याची नोटीस सायबर पोलीस सहाय्यक आयुक्त यांनी शुक्रवारी काढली होती.
फडणवीस यासंदर्भात म्हणाले की, सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ.ते म्हणाले, मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. पोलीस केव्हाही येऊ शकतात.
फडणवीस यांना गेल्या सप्टेंबर मध्ये प्रश्नावली पाठवण्यात आली होती. तिला फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सुचना देण्यात आल्या होत्या. नंतर पोलिसांनी वेगळी भुमिका घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App