भिवंडीतील कोसळलेल्या इमारतीचा मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी

मुंबई : भिवंडीतल्या वळपाडा परिसरात रविवारी 3 मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला. त्यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 14 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही बचावकार्य सुरुच आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. The owner of the collapsed building in Bhiwandi has been detained by the police

नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असे ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचे नाव आहे. पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या. दुर्घटनाग्रस्त इमारतीत Bhiwandi Building तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचे गोडाऊन होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनविण्यात आल्या होत्या. ज्यात भाडेतत्वावर नागरिक राहत होते. इमारतीवरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. ज्यात 27 ते 30 खोल्या बनविण्यात आल्या होत्या.

धक्कादायक म्हणजे, या कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने ही इमारत कोसळल्याचे बोलले जात आहे.

The owner of the collapsed building in Bhiwandi has been detained by the police

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात