वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत हाॅटस्पाॅट गावांची संख्या १४४ होती. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावांची संख्या दुप्पट झाली आहे. जिल्ह्यात आता कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या 308 झाली आहे. The number of hotspot villages in Pune district has doubled, the picture in the second wave; Hotspot Village 308
विशेष म्हणजे जिल्ह्यात 444 गावे कोरोनामुक्त आहेत. परंतु , शिरूर, जुन्नर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यात सर्वाधित हॉस्पॉट गावे आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 सप्टेंबर 2020 मध्ये 144 हॉटस्पॉट गावांची नोंद झाली. त्यानंतर संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे नियम शिथिल केले. मात्र, फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोनाने डोक वर काढले आणि 10 मार्च रोजी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या 41 वर पोचली. मार्चअखेर ही संख्या 131 होती. तर 14 एप्रिल रोजी यामध्ये दुप्पट वाढ होवून 308 वर पोचली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App