विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई विमानतळाने दैनंदिन फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला. मुंबई विमानतळावरून दररोज ६६० उड्डाण होणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने १०० टक्के प्रवासी क्षमतेसह विमान उड्डाणाची परवानगी दिल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेणे विमान कंपन्यांना सोपे जाणार आहे.
The number of flights from Mumbai airport will increase to 660 daily in the winter schedule
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई विमानतळाने दैनंदिन फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला. मुंबई विमानतळावरून दररोज ६६० उड्डाण होणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने १०० टक्के प्रवासी क्षमतेसह विमान उड्डाणाची परवानगी दिल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेणे विमान कंपन्यांना सोपे जाणार आहे.
मुंबई विमानतळ प्रशासनाने बुधवारी हिवाळी वेळापत्रक जारी केले असून, दररोज ६६० उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत. २६ मार्च २०२२पर्यंत हे वेळापत्रक लागू राहील. कोरोनापश्चात विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. त्यामुळे वाढीव प्रवाशांना सामावून घेण्यासह अधिकाधिक मार्ग खुले करण्याच्या दृष्टीने या वेळापत्रकाची आखणी करण्यात आली आहे. उन्हाळी हंगामाच्या तुलनेत हिवाळ्यात ३५ टक्के फेºया वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबई विमानतळावरून दररोज ६६० विमाने ये-जा करतील.
NAVI MUMBAI AIRPORT: ‘आता आमचा निर्धार ठाम, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’; तांडेल मैदानात आंदोलन ; पोलिसांचा कडक बंदोबस्त;महिलांचा उस्फूर्त सहभाग
२०१९च्या हिवाळ्यात ६५७, तर २०२०मध्ये ४३५ दैनंदिन फेऱ्या नियोजित होत्या. यंदाच्या हंगामात गेल्या दोन्ही हंगामात दिल्ली, गोवा, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. चालू हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० ते ८५ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हवाई वाहतूक महासंचालनालयाने १०० टक्के प्रवासी क्षमतेसह विमान उड्डाणाची परवानगी दिल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना सामावून घेणे विमान कंपन्यांना सोपे जाणार आहे. या फेऱ्यांमध्ये इंडिगोच्या २४०, स्पाइसजेट १२० आणि गोफर्स्टच्या ९० साप्ताहिक उड्डाणांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App