विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला 2004 मध्ये 72 आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनविण्याची संधी आली होती. परंतु, काँग्रेस बरोबर आघाडीचे राजकारण करताना मुख्यमंत्रीपदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने सोडून दिली, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. मात्र हे वक्तव्य करताना जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली?, की आपली मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षाच बोलून दाखवली?, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. The NCP had a chance to become the Chief Minister, but …; Jayant Patil expressed his grief … or … ambition … ??
तळेगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणून राज्यातला पहिल्या नंबरचा पक्ष बनवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिवसातले 24 तास काम करत असतात. त्यांना 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून देऊन अनोखी भेट द्यायची आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
मात्र त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी आल्याची कहाणी सांगितली. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विधानसभेवर 72 आमदार निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती परंतु काँग्रेसबरोबर आघाडी राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री पदाची संधी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने सोडून दिली याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 114 की 120 जागा लढवेल हे नंतर ठरेल. पण जेवढ्या जागा लढवू त्या सर्व निवडून आणायची जबाबदारी आपण सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाच्या संधीचे विधान करून जयंत पाटील यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे? की 2024 नंतरची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा??, या विषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जर 114 किंवा 120 जागा लढवणार असेल, तर फक्त काँग्रेसबरोबर आघाडी करून ही निवडणूक लढवली जाईल का आणि शिवसेनेला आघाडीतून निवडणूक लढवण्यास पुरते वगळले जाईल का?, या विषयी देखील चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App