महाराष्ट्र सरकार भगूरमध्ये सावरकर थीमपार्कसह आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार

प्रतिनिधी

नाशिक : भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे महानायक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर (जि. नाशिक) येथे त्यांचे जीवनकार्य मांडणारे थीमपार्कसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय महाराष्ट्र सरकार उभारणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. भगूर येथे सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाद्वारा आयोजित पदयात्रा आणि अभिवादन कार्यक्रमाला संबोधित करताना लोढा यांनी ही घोषणा केली. The Maharashtra government will set up an international museum along with the Savarkar theme park in Bhagur

स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त रविवारी (दि. 26 फेब्रुवारी) भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोढा पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि जीवनकार्य सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणा आहे व त्यांचे हे जीवनकार्य, विचार भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

याच अंतर्गत सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. यात भगूर येथील गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत असलेले थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आपल्याकडे हस्तांतरित करून घेत असून त्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष एकनाथ शेटे म्हणाले, सावरकरांचे स्मारक साकारण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून सरकारदरबारी लढा लढला. भारतात कोणत्याही राष्ट्रपूरूषाच्या जयंती अथवा पुण्यतिथील गर्दी होत नाही एवढी गर्दी भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या जन्मस्थळी होते, असेही शेटे म्हणाले.

आमदार राहुल ढिकले म्हणाले की, सावरकरांच्या स्मृती जपण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक सावरकरांच्या कार्याबद्दल दुर्लक्ष करण्यात आले. मात्र विद्यमान सरकारने त्यांच्या स्मृतिंना उजळा देऊन त्यांचे कार्य जगभरात पोहचविणार असल्याचे ढिकले यांनी सांगतिले.

या कार्यक्रमास साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, आ. सरोज अहिरे, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, नाशिक मध्यचे अध्यक्ष देवदत्त जोशी, सिडको अध्यक्ष अविनाश पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय केकाणे यांनी केले तर मृत्युंजय कापसे यांनी आभार व्यक्त केले.

The Maharashtra government will set up an international museum along with the Savarkar theme park in Bhagur

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात