विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज साजरी होत आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना एक पत्र लिहिले होते. त्यात शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे वर्णन केलेले आहे. या पत्रातील प्रत्येक ओळ देशातील राज्यकर्ते आणि नागरिकांसाठी आजही प्रेरक आहे. ‘ शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप’ अशी या पत्रातील पहिली ओळ आहे. समर्थांनी लिहिलेले ते पत्र पाहूया. The letter of Samarth is still inspiring today
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App