महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे; पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि भावी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!

Election Commission

नाशिक : महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन समांतर घडामोडी घडल्या.The leaders of the Mahavikas Aghadi went to the Election Commission

महाविकास आघाडीचे नेते आज निवडणूक आयोगाला भेटले. राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीत समावेश करायला काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोध असला तरी निवडणूक आयोगाला भेटायला जायला काँग्रेसच्या नेत्यांना राज ठाकरे बरोबर हवे होते. राज ठाकरे सुद्धा काँग्रेस नेत्यांच्या बरोबर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चोकलिंगम यांना भेटायला गेले. तिथे त्यांनी निवडणूक आयोगाला 7 प्रश्न विचारले. त्यात प्रामुख्याने मतदार याद्यांच्या आणि मतदार नोंदणीच्या तक्रारी होत्या. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर कम्युनिस्ट पार्टी, शेकापचे नेते सुद्धा होते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विषयी तक्रारी करण्यासाठी प्रामुख्याने ही भेट होती.



– महाविकास आघाडीची उदासीनता

पण त्या पलीकडे जाऊन निवडणुकीची तयारी करावी लागते त्याबद्दल महाविकास आघाडीत अजूनही उदासीनताच दिसली. मध्यंतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काही बैठका घेतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या परंतु प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चामध्ये सामील होणे किंवा छोट्या मोठ्या घटनेवरून आंदोलन करणे त्यापलीकडे महाविकास आघाडीचे नेते गांभीर्याने निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसले नाही. अजूनही त्यांनी जमिनी स्तरावर काम सुरू केल्याचे समोर आले नाही.

दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन 50 टक्के तिकिटे राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्याची घोषणा केली पण मुळातच त्यांच्याकडचे निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते अजित पवारांच्या बरोबर गेल्याने शरद पवारांना नव्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यावरून पर्याय नाही हे सत्य पवारांनी बोलून दाखविले नाही.

– फडणवीस यांचा धडाका

महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर महायुतीतले घटक पक्षांचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षांच्या बैठकांचा धडाका लावला. पक्षप्रवेशासाठी वेळ देऊन अनेकांचे पक्षप्रवेश करवून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विभागवार पक्षाच्या बैठका घेऊन स्वबळाची चाचपणी केली. शक्यतो महायुती म्हणून निवडणूक लढवा अन्यथा दुसऱ्या पक्षांमधले बळकट उमेदवार भाजपमध्ये आणून स्वबळावर निवडणूक लढवा अशा सूचना फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

– शिंदे पोहोचले प्रभागांमध्ये

एकनाथ शिंदे तर थेट वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रभागांमध्ये घुसले

0मागाठाणे विधानसभा मतदारसंघांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण आज करण्यात आले. या विकासकामांमुळे या प्रभागातील नागरिकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.

यात प्रामुख्याने,‌शिवसेना माजी नगरसेविका रिद्धी भास्कर खुरसुंगे यांच्या प्रभाग क्रमांक ११ दहिसर सावरपाडा येथील मुंबई पब्लिक स्कूल मधील एआय आणि रोबोटिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका गीता सिंघण यांच्या बोरीवली पूर्व येथील देवीपाडा प्रभाग क्रमांक १२ मधील महाकाली एसआरए धारकांना भाडेवाटप करण्यात आले. तसेच या प्रभागात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.

दहिसर येथील गणपत पाटील नगर प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना विभागप्रमुख राम यादव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

कांदिवली पूर्व, चारकोप सेक्टर क्रमांक ३ येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका संध्या विपुल दोशी यांच्या प्रभाग क्रमांक १८ येथील मैदानाचे भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, युवासेना कार्यकारणी सदस्य राज सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे तसेच शिवसेना माजी नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– राष्ट्रवादीचे परिवार मिलन

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी परिवार मिलन या नावाखाली मेळावे भरून आपला जुना प्रभाव पुन्हा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर लढावे लागले तर त्याची तयारी असली पाहिजे याची जाणीव अजित पवारांनी कार्यकर्त्यांना करून दिली. त्यांनी शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शहरांमध्ये खाली करायची नेपथ्य रचना करून घेतली.

The leaders of the Mahavikas Aghadi went to the Election Commission; but the leaders of the Mahayuti reached the party meetings and the wards of the future corporators!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात