विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकताच प्रदर्शित झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा अनेक अर्थाने समाज माध्यमांवर गाजतोय .. काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा आहे. तर काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे वास्तव ..The Kerala story box office collection…
मात्र हे सगळं होत असताना सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘ द केरळ स्टोरी ‘ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय ..’ द केरळ स्टोरी’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन अवघे सहा दिवस झाले असून, या सिनेमांनं आत्तापर्यंत 70 कोटींचा गल्ला पार केलाय .. रिलीज झालेल्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.. रिलीज च्या पहिल्या दिवशी या सिनेमाची कमाई 8.3 कोटी होती..
तर दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी तिसऱ्या दिवशी 16.40 कोटी चौथ्या दिवशी 10.7 कोटींची कमाई तर पाचव्या दिवशी 11.40 कोटी इतकी कमाई या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली आहे..
‘द केरळ स्टोरी ‘ हा सिनेमा लवकरच 100 कोटी क्लबमध्ये सामील होईल. असा विश्वास व्यक्त केला जातोय..तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात तेथील राज्य सरकारने या सिनेमावर बंदी घातली आहे..
मात्र उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश यासारख्या राज्यात हा सिनेमा करमुक्त म्हणजेच टॅक्सं फ्री करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे .. गुजरात मध्ये हा सिनेमा मुलींना मोफत दाखवण्यात येत आहे…तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये देखील द केरळ स्टोरी या सिनेमाचे मोफत काही खास शो आयोजित करण्यात आले आहेत..
द केरळ स्टोरी या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, या सिनेमाची असलेली तगडी स्टार कास्ट.
अदा शर्मा, योगिता बियाणी, सोनिया बलनी आणि सिद्धी इडनाणी या चौघीही या सिनेमातं महत्त्वाच्या भूमिकेत असून, यांच्या सोबतच या सिनेमातील प्रत्येक कलाकारांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होतांना दिसतय..
चाळीस कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाला विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांच्या सह अनेक बड्या अभिनेत्यांचा पाठिंबा मिळताना दिसतोय..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App