पुण्यात साखरपुड्याला गेलेल्या सोलापुरातील हॉटेल व्यवसायिकाचे घर फोडले ; साडेआठ लाखांचे दागिने लंपास

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : सोलापुरातील हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथील हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल ८ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. हा चोरीचा प्रकार काल पहाटे उघडकीस आला. The house of a hotelier in Solapur broken, who had gone to Pune, Jewelry stolen

सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अफसर मोहम्मद शफी खान हे २७ फेब्रुवारी रोजी मावशीच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी पुणे येथे गेले होते. या दरम्यान अज्ञातांनी बंगल्याचे कुलूप तोडून कपाटांमध्ये ठेवलेले दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे नेकलेस, २ लाख ४० हजार रुपये किमतीचे दुसरे नेकलेस, २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या, ३० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीची चेन, ३० हजार रुपये किमतीचे झुमके असे एकूण८ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.



अफसर खान सोलापुरात आले. त्यांना बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. कपाट फोडून चोरी केल्याचे आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी एमआयडिसी पोलिसांची संपर्क साधून माहिती दिली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंत्री चंडक अंगण परिसरातीलच हार्डवेअरचे व्यापारी जुनेस तिम्बसवाला यांचेही घर फोडल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाट करून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांनी दिली.

The house of a hotelier in Solapur broken, who had gone to Pune, Jewelry stolen

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात